अजित पवार यांनी केली या परिसराची पाहणी...


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - 'निसर्ग' चक्रीवादळामुळेमावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणीउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी
आज केली. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली.

'निसर्ग' चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.यावेळी पवारांनी बाधित शेतकरी, नागरिक, गावकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणत्याही बधितांचे नुकसानीचे पंचनामे रहाता कामा नयेत, आशा स्पष्ट सूचना दिल्या.

उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाईल. आम्ही केंद्रसरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post