पैशाच्या व्यवहारातुन तिघांकडुन मारहाण



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – पैशाच्या मागणीकरीता कायमच फोन का करतोस? असे म्हणुन तिघांनी एकास लोखंडी गज व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना दाळमंडई येथील आर के ट्रान्सपोर्ट समोर शुक्रवारी (दि.12) दुपारी घडली.

पैशाच्या मागणीकरीता जाकीर इसहाक सय्यद (वय- 46, रा. मोठी मरीयम मस्जिद, मुकुंदनगर) हा वारंवार फोन करतो. याचा राग येऊन अन्वर रज्जाक शेख उर्फ भैय्या (रा. मुकुंदनगर), मुश्ताक निजाम मोहमंद शेख उर्फ पप्पु रिक्षावाला (रा. राजकोट कॉलनी, मुकुंदनगर), शेख शकील बाबा (रा. गजराजनगर) यांनी जाकीर यास गज व दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत जाकीर जखमी झाला. या प्रकरणी जाकीर सय्यद यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास महिला पोलिस नाईक पठारे या करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post