हा भाग कंन्टेन्मेंट झोन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील सिद्धार्थनगर व तोफखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही भागात कंन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. या झोनमध्ये दि.7 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला असून दोन्ही परिसरातील रस्ते पत्रे लावून सील करण्यात आले आहे.
नगर शहरात बुधवारी (दि.24) एकाच दिवसात तब्बल 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्हाधिकार्यांसह महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत या परिसरातून कोरोना विषाणूचा शहरात इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवाल यांनी सिद्धार्थनगर व तोफखाना परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर केला आहे. तसेच त्या भोवतालचा परिसर व बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बफरझोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र इतर आस्थापना व दुकाने बंद राहणार आहेत.
Post a Comment