जाणून घ्या ; कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या 10 टीप्स !
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - कॅन्सर हा किती खतरनाक आणि जीवघेणा आजार आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. यामुळं मृत्यूचा धोका जास्त असतो. भारतात गेल्या 26 वर्षात कॅन्सरचं प्रमाण दुप्पट झालं आहे. याचे अनेक प्रकार आहेत. आज आपण कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही टीप्स जाणून घेणार आहोत.
1) आहार आणि व्यायाम – आपल्या लाईफस्टाईलमधील अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. यात धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायाम न करणं आणि खराब आहार अशा गोष्टी आहेत. त्यामुळं नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
2) शरीरावरील गाठी – शरीरावर कोणत्याही प्रकारच्या गाठी असतील किंवा इतर काही लक्षणं जी कॅन्सरची असतील त्याकडं लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका.
3) तंबाखू – कोणत्याही प्रकारच्या तंबाखूनं कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. त्यामुळं याचं सेवन आजच बंद करा.
4) पाणी गाळून घ्या – पिण्याचं पाणी कायम गाळूनच घ्या. कारण यात असणाऱ्या कार्सिनोजेन्स आणि हार्मोन केमिकल्समुळं तुम्हाला धोका होऊ शकतो.
5) पाणी भरपूर प्या – भरपूर पाणी पिऊन आणि इतर तरल पदार्थांचं सेवन करून मुत्राशयाच्या कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळं शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात.
6) फळं आणि पालेभाज्या – फळं आणि पालेभाज्या यांचं जास्त सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंट्समुळं अनेक आजार दूर करण्यास मदत होते.
7) आले-लसूण – आलं आणि लसूण यांचं सेवन केल्यानं फुप्फुसाला आवश्यक पोषकतत्व मिळतात. याच्या सेवनानं फुप्फुसाच्या कॅन्सरपासून तुम्ही दूर राहता. आहारात याचा नियमित समावेश असूद्या.
8) मॅमोग्राम – महिलांनी वयाच्या चाळीशीनंतर नियमित मॅमोग्राम करावं. महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा जास्त धोका असतो. मॅमोग्राम करून याची माहिती मिळते की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचा किती धोका आहे. यामुळं वेळीच उपचार घेता येतात.
Post a Comment