महापालिकेने उभारले 100 बेडच्या कोविड सेंटर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोनाचा प्रसार शहरामध्ये झपाटयाने होत असताना बुथ हॉस्पीटल व जिल्हा रूग्णालय तसेच इतर काही खाजगी रूग्णालयामध्ये रूग्णांवर उपचार करणेसाठी जागा शिल्लक नसल्यामुळे अहमदनगर महापालिकेमार्फत दसरे नगर येथील आनंद लॉन या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या १०० खाटांच्या कोविड रूग्णांना मोफत उपचार सेवा पुरविण्यात येणार आहे.
तसेच या ठिकाणी मनपाच्या खर्चाने तेथील रूग्णांना उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मनपाचे १ एम डी फिजीशियन, १ बालरोग तज्ञ, १ जनरल डॉक्टर व नर्सेस, आरोग्य व इतर विभागातील असे १५ कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकाणची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली.
यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, अजय ढोणे, सतिष शिंदे, मनोज ताठे, उदय कराळे , पुष्कर कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ.बोरगे व कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, लॉकडाउनच्या काळामध्ये मनपाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठया जनजागृती मोहिम हाती घेतली होती व आजतागायत ती सुरू आहे. तसेच रामकरण सारडा येथे शहरातील नागरिकांसाठी मोफत स्त्राव चाचणी केंद्र मनपा मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. कोविडच्या काळामध्ये मनपाने एकूण सात आरोग्य केंद्रा मार्फत ४२ आरोग्य पथकाची नियुक्ती केलेली आहे. या आरोग्य पथकांमार्फत पॉझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या भागामध्ये सर्व्हेक्षण करणे हायरिस्क तसेच लोरिस्क कॉन्टॅक्ट शोधने त्यांच्या चाचण्या करून त्यांच्यावर औषधोपचार करणे व आरोग्य विभागामार्फत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करून घेणे इत्यादी कामे या पथकामार्फत केली जातात.
आजपर्यत शहरामध्ये ५५ ते ५६ कंटेन्मेंट झोन मनपाद्वारे जाहिर करण्यात आली. काही अदयाप सुरू आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये मनपामार्फत नागरिकांसाठी दूध, भाजीपाला, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व इतर काही तातडीच्या सेवा देण्यात येत आहेत. त्यासाठी मनपाद्वारे हेल्पलाईन नंबर जाहिर करण्यात आले आहेत. औषधांसाठी ०२४१-२३२४८२३ व इतर तक्रारींसाठी ०२४१-२३४०५२२, २३६०५२२ या हेल्पलाईनद्वारे शहरातील नागरिकांच्या तक्रारी दखल घेवून त्या सोडविण्याचे काम मनपाद्वारे करण्यात येत आहे.
मनपाचे आतापर्यत १३ क्वॉरटाईंन सेंटर कार्यरत असून २००० बेडची क्षमता या सेंटरची आहे. या सेंटरमध्येही मनपा मार्फत सर्व सुविधा पुरविल्या जातात.
योवळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे म्हणाले की, मनपाने सुरू केलेल्या कम्युनिटी किचन मार्फत आजपर्यत २० ते २५ हजार नागरिकांना मोफत अन्नवाटप करण्यात आले. हॉटेल संजोग व जाधव लॉन या दोन ठिकाणी अत्यंत सुसज्ज किचनसह या कम्युनिटी किचनची सुरूवात करण्यात आली होती. यातील संजोग लॉन येथील किचन नागरिकांच्या सेवेत अजूनही उपलब्ध आहे.
नागरिकांना सुविधा मिळाव्या यासाठी मनपा मार्फत सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
Post a Comment