नगर जिल्ह्यात 117 नवे रुग्ण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 117 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 18, भिंगार येथील 25, नगर शहर 13, श्रीगोंदे येथील 8 बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 439 इतकी झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना प्रयोगशाळेत शुक्रवारी (दि.17) 21 जणांचे अहवाल बाधित आढळून आले. पारनेर तालुक्यातील साबळेवाडी येथील 1, नांदूरपठार येथील 1 आणि पळसपूर येथील एक बाधित आढळला आहे. भिंगार येथे तब्बल 10 कोरोना बाधित आढळून आले आहेत. नगर तालुक्यातील वाकोडी येथे 1, डोंगरगण येथे 1 बाधित आढळला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील कोळगावात 3, लोणी व्यंकनाथ येथे 2 कोरोनाबाधित आढळले आहेत.
दरम्यान, गुरुवारी रात्री 18 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील 2, राजापूर येथील 1, बागवानपुरा येथील 4, घुलेवाडी येथे 1, सय्यदबाबा चौकात 3, सुकेवाडी येथे 1 कोरोनाबाधित आढळले आहेत. नगर शहरात 5, अकोले तालुक्यातील कळंब येथील 1 बाधित रुग्ण आढळला आहे.
शुक्रवारी सायंकाळी आणखी 29 बाधित आडळले आहेत. त्यामध्ये भिंगार येथील 13, संगमनेरातील 6, नेवासे येथील 5, नगर शहरातील 3, श्रीरामपूर येथील 2 बाधित आढळले आहेत. याशिवाय 31 बाधित खासगी रुग्णांलयात आढळले आहेत.
रात्री 8.45 वाजता नव्याने 18 कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामध्ये नगर शहरातील 5, भिंगार येथील 2, श्रीरामपूर तालुक्यातील 3, श्रीगोंदे तालुक्यातील 3, कर्जत तालुक्यातील 1, अकोले तालुक्यातील 3 व राहुरी तालुक्यातील गुहा येथील एका कोरोनाबाधिताचा समावेश असल्याचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी सांगितले.
22 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील 22 बाधित रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली आहे. त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 15, पारनेर तालुक्यातील 2, नगर तालुक्यातील 2, नगर शहरातील 1, अकोले येथील 1व श्रीरामपूर येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 794 इतकी झाली आहे.
Post a Comment