12 वी परीक्षेचा अहमदनगर जिल्ह्याचा 91.97 टक्के निकाल



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2020 मध्ये घेतलेल्या 12 वीच्या परीक्षेच्या निकालात नगर जिल्ह्याचा निकाल 91.97 टक्के लागला असून पुणे विभागाचा निकाल 92.50 टक्के आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा प्रथम (93.74 टक्के), पुणे जिल्हा द्वितीय क्रमांकावर (92.24 टक्के) तर नगर जिल्हा तिसर्याक क्रमांकावर (91.97 टक्के) आहे. निकालात नगर जिल्ह्यासह विभागातही मुलींनी बाजी मारली आहे. नगर जिल्ह्यातून 36 हजार 682 मुले आणि 26 हजार 831 मुली असे एकूण 63 हजार 513 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 32 हजार 621 मुले व 25 हजार 791 मुली असे एकूण 58 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणारांमध्ये मुलांचे प्रमाण 88.93 टक्के तर मुलींचे प्रमाण 96.12 टक्के एवढे आहे. जिल्ह्यात कर्जत तालुक्याचा सर्वाधिक 95.75 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 98.01 टक्के, कला शाखेचा 80.61, वाणिज्य शाखेचा 94.55 टक्के निकाल लागला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post