पुण्यात दिवसात उच्चांकी रुग्ण
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - एकट्या पुणे शहरात बुधवारी दिवसभरात विक्रमी 1 हजार 416 नवे रुग्ण आढळले. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 449 नवे रुग्ण आढळले असून, पुण्यात (बुधवारी) एकूण 1865 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली. त्याप्रमाणेच पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 15 अशा एकूण 30 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात बुधवारी 4,015 संशयितांचे नमुने आरटीपीसीआर चाचणीसाठी घेण्यात आले; तर अँटिजेंन चाचणीसाठी 2,328 नमुने घेण्यात आले. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 965 आरटीपीसीआरचे तर 451 अँटिजेनचे असे एकूण 1,416 नमुने पॉझिटिव्ह आले. शहरात आतापर्यंत 30 हजार 523 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 746 तर आतापर्यंत 19,570 रुग्ण कोरोनातून बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरात 10 हजार 64 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 502 गंभीर असून, 76 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान बुधवारी पुणे शहरात 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 10 पुरुष तर 5 महिला आहेत. या मृतांचे वय 32 ते 84 च्या दरम्यान होते. 32 वर्षीय तरुण वडगाव येथील रहिवासी होता. उरलेले शनिवार पेठ, बाणेर, कर्वेनगर, मुंढवा, कोथरूड, कोंढवा, भवानी पेठ, खराडी, बोपोडी, येरवडा, कात्रज, मार्केट यार्ड, शिवाजीनगर व शुक्रवार पेठ येथील रहिवासी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 889 वर पोचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 449 नवे रुग्ण आढळले असून, पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 8,859 झाली आहे. आज 7,308 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर 350 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. बरे झालेल्या 356 जणांना घरी सोडण्यात आले. रहाटणीतील पुरुष (69), भोसरीतील 3 पुरुष व 1 महिला (70, 73, 75 व 55), कासारवाडीतील महिला (68), अजंठानगर, निगडीतील महिला (60), दापोडीतील 2 पुरुष (72 व 76), पिंपरीतील 2 पुरुष (62 व 77), थेरगावातील 2 पुरुष (36 व 72), अंजठानगर, चिंचवडमधील पुरुष (55) आणि औंध रस्ता येथील महिला (73) या 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Post a Comment