आशिया कप 2021 मध्ये हाेणार ?



माय अहमदनगर वेब टीम
दुबई -  आशिया क्रिकेट परिषद (एसीसी) ने 2020 आशिया कपला रद्द करण्याची गुरुवारी अधिकृत घोषणा केली आहे तर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनी एक दिवसापूर्वीच हेच मत मांडले होते.

एसीसीने म्हटले की आशिया कपला जून 2021 मध्ये आयोजीत करण्यावर काम करत असून हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही योग्य विंडोला शोधत आहोत.

एसीसीने एका निवेदनात म्हटले की एसीसीच्या कार्यकारी मंडळने सप्टेंबर 2020 मध्ये होणार्‍या आशिया कप स्पर्धेवर पडलेल्या कोविड-19 महामारीच्या प्रभावाचे मुल्यांकन करण्यासाठी अनेक वेळा बैठका केल्या आहेत. मंडळ सुरुवाती पासून खर्‍या कार्यक्रमानुसार स्पर्धेला आयोजीत करण्यास उत्सुक होता. मात्र प्रवास बंदी. मूलभूत आरोग्य जोखिम आणि फिजिकल डिस्टेसिंगने आशिया कपच्या आयोजना समोर अनेक आव्हाने उभे केले आहे.

मंडळाने म्हटले की या सर्व कारणामुळे यामध्ये भाग घेणार्‍या खेळाडू, सपोर्ट स्टाफ, वाणिज्यीक भागीदार, प्रशंवसक आणि कि‘केट समुदाया बरोबर आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधीत जोखिमाना महत्वपूर्ण मानले गेले आहे. या सर्व कारणावर सावधगिरीपूर्वक विचार केल्यानंतर मंडळाने निर्णय केला की आशिया कप 2020 ला स्थगित केले गेले पाहिजे.

एसीसीने म्हटले की स्पर्धेच्या आयोजनाला एक जबाबदार पध्दतीने आयोजीत करणे एसीसीची प्राथमिकता आहे आणि मंडळाला आशा आहे की 2021 मध्ये स्पर्धा आयोजीत केली जाईल. एसीसी जून 2021 मध्ये याला आयोजीत करण्या बाबत विंडोला शोधण्याच्या दिशेमध्ये काम करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post