24 तासात देशात 29,429 कोरोना रुग्णांची वाढ तर 582 रुग्णांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 29,429 रुग्ण वाढले असून 582 रुग्णांना मृत्यू झाला आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या 9 लाख 36 हजार 181 वर पोहोचली आहे. सध्या देशात 3 लाख 19 हजार 840 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 92 हजार 032 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना संक्रमितांच्या यादीत भारत जगात तिसर्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जर प्रति 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत संक्रमित आणि मृत्यू दर पाहिला तर इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे. भारताहून अधिक रुग्ण अमेरिका (3,544,719) आणि ब्राझील (1,931,204) या 2 देशांमध्ये आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसर्या स्थानावर तमिळनाडू तर तिसर्या स्थानावर दिल्ली आहे. यानंतर गुजरात आणि पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो. या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
Post a Comment