राज्यात 24 तासांत 9 हजार करोना रुग्णांची नोंद
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांच्य संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासांत राज्यात तब्बल 9 हजार 518 नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला असल्यानं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. यासोबतच देशातील करोनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्याने चिंता वाढली आहे.
राज्यात आज दिवसभरात करोना संसर्गाच्या 9518 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 258 जणांना करोनाच्या संसर्गामुळं जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 82 टक्के इतका असून एकूण करोना मृतांचा आकडा 11 हजार 854वर पोहोचला आहे. राज्यात एकूण 3 लाख 10 हजार 455 रुग्ण करोनावर उपचार घेत असून 1 लाख 28 हजार 730 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात 7 लाख 54 हजार 370 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 45 हजार 846 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Post a Comment