जिल्ह्यात आज वाढले 48 नवे रुग्ण



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालय येथील करोना टेस्ट लॅबमध्ये आज 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 07 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 367 इतकी झाली आहे. तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 727 इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार, करोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील 05, संगमनेर 31, अकोले 05, अशा रुग्णाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात निमोन 03, कासार दुमाला 02, गुंजाळ वाडी 02, माहुली 08, साकुर 01, तळेगाव दिघे 01, वडगाव 01, संगमनेर शहरातील 13 जण बाधित आढळून आले आहेत.

अकोले तालुक्यात देवठाण 01, उंचाखडक 01, चास 03 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर अहमदनगर महापालिका क्षेत्रात 05 जण बाधित आढळून आले आहेत.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर मनपा 01, राहाता 01 आणि संगमनेर तालुक्यातील 05 जणांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post