'या’ 5 आजारांमुळे लघवीला येते दुर्गंधी वाचा सविस्तर



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क –  लघवीची दुर्गंधी येत असल्यास कधीही दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. कारण या दुर्गंधी पाठीमागे एखादा गंभीर आजार असू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने ही समस्या कमी होऊ शकते. परंतु, तरीही दुर्गंधी येत असल्यास डॉक्टरांकडे जरूर जा. शरीरातील विषारी पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. कोणत्या आजारांमुळे लघवीला दुर्गंधी येते ते जाणून घेवूयात…

हे आहेत ते आजार

1 एसटीडी
लघवीच्या दुर्गंधीमुळे वजायनल इन्फेक्शन किंवा त्याहीपेक्षा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा.

2 चुकीच्या पदार्थांचे सेवन
जास्त मसालेदार पदार्थ, लसूण आणि कांदा खाल्याने लघवीचा वास येतो. अति मद्यसेवन, धुम्रपानामुळे लघवीचा वास येत असतो.


 
3 डायबिटीज
लघवीला जास्त वास येत असल्यास डायबिटीस असू शकतो. गरोदरपणात सुरूवातीच्या काही दिवसात मुत्राचा खूपच घाणेरडा वास येत असतो.

4 युटीआय
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शिन असल्यास महिलांच्या लघवीतून वास येतो. युटीआई इन्फेक्शनमुळे गर्भपिशवी खराब होऊ शकते. आग होते. यासाठी तोबडतोब डॉक्टरांकडे जा.

5 डिहायड्रेशन
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशन होते. व्ययामुळे लघवीला घाणेरडा वास येतो. लघवीचा रंग पिवळा होतो. पोट साफ होण्याची समस्या होते. यासाठी दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्या. परंतु, गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post