चरबीचा घेर वाढतोय ? ‘या’ 5 वाईट सवयी बदला
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - लठ्ठपणा आणि पोटाचा घेर वाढण्याची समस्या सध्या सर्वत्र मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयी यामुळे हा समस्या होते. वाढलेले वजन अथवा पोट कमी करण्यासाठी कोणतीही जादू होऊ शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या औषधांना बळी न पडता, योग्य ते मार्ग निवडल्यास ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी थोडा कालवधी लागू शकतो, पण समस्या पूर्णपणे दूर होऊ शकते. काही वाईट सवयी हद्दपार केल्या तरी तुम्ही पोटाचा घेर कमी करू शकता. या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात.
या चुका टाळा
1 वजन न तपासणे
नियमित सकाळी वजन तपासून पाहावे, यामुळे आणखी किती प्रमाणात वजन नियंत्रणात आणायचे ते स्पष्ट समजेल.
2 उशिरा उठणे
सकाळी उशिरा उठण्याची सवय तात्काळ बंद करा. कारण यामुळे तुमच्या वजन नियंत्रणावर परिणाम होतो. सकाळची कोवळी उन्हे अंगावर येऊ द्या.
3 नाश्ता न करणे
सकाळचा नाश्ता आवश्य करा. यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते, ऊर्जा कायम राहते, वारंवार भूक लागत नाही.
4 गरम पाणी न पिणे
सकाळी ग्लासभर गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रवपदार्थही बाहेर फेकले जातात व पचनक्रिया सुधारते.
5 स्ट्रेचिंग न करणे
स्ट्रेचिंग करणे म्हणजे अंग ताणण्याचा व्यायाम सकाळी केल्यास शरीरासाठी अतिशय उत्तम ठरतो. यामुळे ताण-तणाव थकवा कमी होतो, लवचिकताही वाढते, अतिरिक्त चरबी कमी होते, शरीराचा आकार सुडौल होतो.
Post a Comment