शासनाचा निषेध नोंदवित, 8 दिवसांसाठी दुकाने बंद ठेवण्याचा नाभिक समाजाचा निर्णय
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- विविध निवेदने, वारंवार प्रशासनासोबत बैठका, त्यासाठी राज्य पातळीपासुन तालुका व गाव पातळीपर्यंतच्या सर्व नाभिक संघटनांचे प्रयत्न. तरीही शासनाने नुकतीच फक्त केस कापण्यासाठी परवानगी दिली. इतर कोणत्याही सेवा देण्यास अद्यापही मज्जाव केला आहे. शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे, म्हणून आम्ही शासनाचा निषेध नोंदवित असुन, अकोले शहरातील दुकाने 8 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा देखील निर्णय आम्ही घेतला असल्याचे श्री संतसेना नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण चौधरी यांनी सांगितले.
मार्च 2020 पासुन कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हैराण केले आहे, त्यातुन अकोले देखील सुटलेले नाही. अशा परिस्थितीत शासनाने जे जे नियम सर्वांसाठी लागु केले, त्या नियमांच्या अधिन राहुन आमची नाभिक संघटना देखील त्यामध्ये 100 टक्के सहभागी झाली. देशाच्या हितासाठी आम्ही हे सर्व केले. परंतु आता विविध व्यवसायास सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेकरीता सर्व व्यवहारास परवानगी दिली. मात्र सलुन व्यवसायावर अद्यापही संक्रांत आहे, असे म्हटले तर वावगं ठरू नये. खरे तर सर्वात गरजु हे आमच्या व्यवसायातील कारागिर आहे, जे इतरांकडे रोजंदारीवर काम करून आपला चरितार्थ चालवितात. त्यांनी दिवसभर कमविलेच नाही तर त्यांच्या परिवारातील सदस्यांची हाता-तोंडाची भेट होत नाही.
Post a Comment