...म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा'


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत डावलण्यात येत असल्याचा सूर याआधी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला होता. आता ऊर्जा खात्यातील नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन नियुक्त्या केल्या पाहिजे, असा सूर व्यक्त केला आहे. आघाडीत नाराजी नसून काही असेल तर ते दुरुस्त केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ऊर्जा खात्यातील नियुक्त्यांचा फेरविचार केला जाईल. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन नियुक्त्या केल्या पाहिजेत. कोणतीही नाराजी नाही. आमदारांना समान वाटप निधी झालं पाहिजे. सर्वांना समान न्याय मिळावा. असे शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांचे म्हणणे आहे, असे थोरात यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post