हैदराबाद - प्रभास स्टारर बाहुबली आणि बाहुबली २ चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबाला हलका ताप आल्यानंतर त्यानंतर त्यांनी कोरोनाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजामौली व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
राजामौली यांनी याबाबत माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची ट्विटरवरून माहिती दिली. तसेच आमची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी राजामौली यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत लवकर बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली आहे.
राजामौली व त्यांच्या कुटुंबियामध्ये कोविड १९ ची सौम्य लक्षणे आढळली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना होम क्वारंटाईन केले गेले आहे.
राजामौली हे आपल्या शरिरात अँटीबॉडी विकसित होण्याची वाट पाहत आहेत. याबाबत त्यांनी ट्विटमध्ये आपले मत व्यक्त केले आहे.
राजामौली हे सध्या ‘आरआरआर’ चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात एनटी रामा राव ज्युनियर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगन आणि श्रेया सरन हे सुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.
Post a Comment