अमेरिकेला चीनचे प्रत्युत्तर, चेंगडू येथील वाणिज्य दुतावासाला टाळे
माय अहमदनगर वेब टीम
बिजिंग - चीनने आज ( दि. 24 ) आपल्या चेंगडू शहरातील अमेरिकेचे वाणिज्य दुतावास बंद करण्याचा आदेश दिला. चीनने हा आदेश अमेरिकेने त्यांचे ह्युस्टन शहरातील वाणिज्य दुतावास बंद केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यात 'अमेरिकेने विनाकारण उचललेल्या पावलावर ही अधिकृत आणि गरजेची प्रतिक्रिया आहे.' असे म्हटले आहे.
याचबरोबर 'सध्याची स्थिती पाहता चीन आणि अमेरिकेचे संबंध चीनला हवे आहेत तसे नाहीत आणि या सर्व गोष्टींनी अमेरिकाच जबाबदार आहे.'असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जगातील दोन सर्वांत मोठ्या अर्थिक महासत्ता असलेल्या देशांमध्ये सध्या अनेक आघाड्यांवर ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने गुरुवारी 72 तासांच्या आत ह्युस्टन वाणिज्य दुतावास बंद केल्याने हे ताणावपूर्ण वातावरण आणखीच चिघळले.
भारत, जपान, दक्षिण कोरियासह चीनविरोधात अमेरिकन आघाडी
दरम्यान, अमेरिकेने चीनवर कोरोना लसीसंदर्भांतील महत्वाची माहिती चोरी केल्याचा आरोप केला आहे. जस्टिस विभागाने दोन चिनी नागरिकांनी शेकडो कंपन्या हॅक करुन कोरोना लसीच्या संशोधनाची माहिती चोराल्याचा आरोप केल्यानंतर अमेरिकेने ही भूमिका घेतली होती.
चीनने अमेरिकेला जर वाणिज्य दुतावास बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. तसेच ताज्या वक्तव्यात चीनने अमेरिकेला परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची आणि द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याची विनंती केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस!
अमेरिकेचे बिजिंमध्ये मुख्य दुतावास आहे. तर चीनच्या विविध भागात 5 वाणिज्य दुतावास आहेत. तर एक वाणिज्य दुतावास दुतावास हाँगकाँगमध्ये आहे. अमेरिकेचे चेंगडू वाणिज्य दुतावास हे 1985 साली स्थापन करण्यात आले होते आणि त्या वाणिज्य दुतावासात 200 कर्मचारी ज्यात 150 स्थानिक चिनी कर्मचारी काम करतात.
Post a Comment