अहमदनगर - जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६९.८० टक्के इतके आहे.*
दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४० रूग्ण आढळले होते. त्यानंतर या संख्येत आणखी १४ रुग्णांची भर पडली. यामध्ये, संगमनेर ०६- निमोण ५, जोरवे १,
श्रीगोंदा ०१- पिंपळगाव पिसा ,
नगर ग्रामीण ०१- चास,
अहमदनगर शहर -०३ - सारस नगर ०३,
पाथर्डी ०२- पाथर्डी शहर ०१, पागोरी पिंपळगाव ०१,
नेवासा (तरवडी) -०१- अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १२६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २२, राहाता ०१, पाथर्डी २२, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर २५, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा १६ आणि कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १८६, कर्जत ०२, राहुरी ०४, अकोले ०१, श्रीगोंदा ०२, नेवासा ०२, श्रीरामपूर ०३, नगर ग्रामीण ०९, पाथर्डी ०७, राहाता १२, संगमनेर ०७, पारनेर ०७, शेवगाव ०३ आणि जामखेड येथील ०३ रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, आज २२८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३, अकोले येथील ०२ रूग्णांना तर अँटीजेन चाचणीत बाधीत आढळून आलेले आणि आता बरे झालेल्या ०६ रूग्णांना आज घरी सोडण्यात आले.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२९४९*
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १६०४*
*मृत्यू: ६०*
*एकूण रुग्ण संख्या: ४६१३*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
Post a Comment