ENGvsWI : ब्रॉड, वोक्सच्या माऱ्यासमोर वेस्ट इंडिज २८७ धावात गारद
माय अहमदनगर वेब टीम
मँचेस्टर - इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅनचेस्टर येथे सुरु असणाऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडने अपेक्षित आघाडी घेतली आहे. आज दिवसअखेर विंडिजला २८७ धावांत रोखत १८२ धावांची आघाडी घेत इंग्लडने आपल्या दुसऱ्या डावास प्रारंभ केला. दिवसातील शेवटचे आठ षटक शिल्लक असताना इंग्लडची टीम फलंदाजीस उतरली. डावाची सुरुवात बेन स्टोक आणि यष्टीरक्षक जोस बटलर यांनी केली. इंग्लडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर बटलरला भोपळा ही फोडता आला नाही. केमार रोचने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर झॅक क्रेवली हा फलंदाजीस आला. तो स्थिरावत असताना रोचने त्याचाही त्रिफळा उडवला. त्याने १५ चेंडूत ११ धावा केल्या. इंग्लंडची अवस्था १७ धावांवर २ बाद अशी झाली होती. यानंतर स्टोक्सला साथ देण्यासाठी कर्णधार जो रुट मैदानात उतरला. अखेर डाव संपला तेव्हा इंग्लंडने २ बाद ३७ धावा बनवल्या होत्या. इंग्लंडने अशाप्रकारे २१९ धावांची आघाडी घेतली आहे. खेळ संपला तेव्हा स्टोक्सने १८ चेंडूत १६ धावा तर रुट ने १३ चेंडूत ८ धावा बनवल्या होत्या.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवसावर पावसाचे पाणी फिरले पण, आज चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने वेस्ट इंडिजचा पहिला डाव सुरु झाला. चौथ्या दिवशी विंडीजने 1 बाद 32 पासून सुरुवात करत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. दुसऱ्या दिवशी जॉन केम्पबेल बाद झाल्यानंतर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या अलझारी जोसेफने दमदार फलंदाजी करत 32 धावांचे योगदार दिले आहे.
Post a Comment