नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीला प्रचंड मागणी आली असून सलग सहाव्या दिवशी वायदे बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. एमसीएक्स बाजारात ऑगस्ट डिलिव्हरीचा सोन्याचा १० ग्रॅमचा दर वाढून ५० हजार ८०० रुपयांवर गेला. दुसरीकडे नफाविक्रीमुळे चांदीचे दर किरकोळ प्रमाणात घसरले. चांदीचा किलोचा दर ६१ हजार ११० रुपयांवर गेला.
'दम आहे तर जीडीपी रोजगार वाढवा....दाढी मिशा कोणीही वाढवू शकतो'
चालू वर्षात आतापर्यंत म्हणजे गेल्या सात महिन्यांच्या काळात सोन्याच्या दरात ३० टक्क्याने वाढ झाली आहे. जगावर कोरोना संकटाने कहर केला असून अमेरिका-चीन यांच्यातील तणाव ही शिगेला पोहोचला आहे. या संकट काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील जगभरात सोन्या-चांदीची खरेदी होताना दिसत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे प्रती औंसचे दर १९०० डॉलर्सपर्यंत गेल्यानंतर आता १८८६ डॉलर्सवर स्थिर झाले आहेत. याआधी सप्टेंबर २०११ मध्ये सोन्याचे दर १९०० डॉलर्सच्या समीप गेले होते.
भारताची स्थिती अमेरिकेसारखी?; एका दिवसात कोरोनाचे ४९ हजारांहून अधिक रुग्ण
चांदीचे प्रती औंसचे दर २२.६६ डॉलर्सवर तर प्लॅटिनमचे दर ९१४ डॉलर्सचा आसपास स्थिर आहेत. जागतिक बाजारात गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या दरात ४ टक्क्यांची तेजी आलेली आहे. मागील तीन महिन्यांतील ही सर्वात मोठी साप्ताहिक तेजी आहे.
Post a Comment