युएईत होणाऱ्या आयपीएलची तारीख ठरली
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आयसीसीने यंदाचा वर्ल्डकप पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा घेण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आयपीएलचे संचालक ब्रिजेश पटेल यांनी बीसीसीआयने आयपीएलची तारीख नक्की केली आहे असे सांगितले. यंदाचा आयपीएल हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. त्यावेळी या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होईल. बीसीसीआयने या बाबतची माहिती फ्रॅंचायजींपर्यंत पोहोचवली आहे असेही सांगण्यात आले.
आयपीएलच्या संचालक ब्रजेश पटेल यांनी पीटीआयला सांगितले की 'आयपीएलची सुरुवात सप्टेंबर 19 पासून होण्याची शक्याता आहे. तसचे नोव्हेंबर 8 ( रविवार) आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएल 51 दिवस चालेल. हा 51 दिवसांचा यंदाचा हंगाम हा फ्रॅंचायजी आणि प्रसारक यांच्यासाठी सोईचा ठरले.'
आयसीसीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी टी - 20 स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानेच यंदाची आयपीएल होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, बीसीसीआयने पुढचा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन एक आठवडा आधीच आयपीएल घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
Post a Comment