जिल्ह्यात 24 तासात 379 नवे रुग्ण, तर 465 रुग्णांना डिस्चार्ज
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३७९ इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६५ रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५१ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळपर्यंत ६४ जण बाधित आढळून आले होते. त्यात अहमदनगर (2), संगमनेर (36),,कर्जत(10), राहाता (12), राहुरी (4) अशा रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात आणखी ४५ रुग्णांची भर पडली. यामध्ये,
कर्जत(4) - राशीन (3), थेरवाडी (1),
अहमदनगर (2) - गुलमोहर रोड (1), अहमदनगर (1)
राहाता (5) - वाकडी (1), गणेश नगर (3), साकुरी (1),
श्रीगोंदा (3)- बनपिंप्री (1), काष्टी (2),
श्रीरामपुर (5)- रेल्वे कॉलनी (1), शहर(4).
संगमनेर (15) - अशोक चौक(1), पदमानगर (3), घुलेवाडी (7), सुकेवाडी (1), धांदरफळ (1), उमरी(1), निमोन(1),
अकोले (02) - वारुडी पठार(1)
वाघापूर कोतुळ (1),
नेवासा (9) - जळका (1), भेंडा बु.(1),गळनिंब (2) करजगाव (5),
अँटीजेन चाचणीत आज श्रीरामपूर येथील ०५ जण बाधित आढळले.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या *२६५ रुग्णांची नोंद* एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२४, कर्जत ०३, *नगर ग्रामीण ०९*, नेवासा ०१, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १४५१*
*बरे झालेले रुग्ण: १९४५*
*मृत्यू: ५१*
*एकूण रुग्ण संख्या:३४४७*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
Post a Comment