मी लॉकडाऊनबाबत अजूनही आग्रही : खा.विखे




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर जिल्ह्यात करोना बाधित वाढत आहेत.
 किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन करावा या भूमिकेवर मी एक डॉक्टर म्हणून ठाम व आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन तुर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही, असे जाहीर केले.  या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खा.विखे म्हणाले, नगरमध्ये लॉकडाऊनची मागणी आपण केली होती. मात्र प्रशासनाच्या अहवालानुसार पालकमंत्र्यांनी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेतला. सरकार म्हणून त्यांचा तो अधिकार आहे.  परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. वाढती रुग्ण संख्या पाहता यंत्रणेवरच ताण येणार आहे.  पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला असता जुने बरे होऊन रुग्ण घरी जाऊन  तर नवीन रुग्णांसाठी बेडस उपलब्ध होतील. लॉकडाऊनमुळे करोना संसर्ग थांबणार नाही. पण यंत्रणा सज्ज करण्यास वेळ मिळेल,  असेही ते

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post