196 किलो वजनाच्या गोरिलाची कोरोना चाचणी



माय अहमदनगर वेब टीम
न्यूयॉर्क - माणसासाठी कोरोना चाचणी ही काही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. मात्र, अमेरिकेत 196 किलो वजनाच्या एका गोरिलाचीही कोरोना चाचणी करण्यात आली.

अवाढव्य आकाराचा हा गोरिला अमेरिकेतील मियामी प्राणीसंग्रहालयात असतो. शांगो असे नाव असलेल्या या गोरिलाची तिथेच आपला धाकटा भाऊ बर्नी याच्याबरोबर हाणामारी झाली. त्यामध्ये 31 वर्षांचा शांगो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या चाचण्यांसाठी फ्लोरिडातील एका लॅबमध्ये आणण्यात आले. तिथे त्याला भूल देऊन अल्ट्रासाऊंड चाचणीपासून ते एक्स-रेपर्यंत अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये टीबीची आणि कोरोनाचीही चाचणी समाविष्ट होती. सुदैवाने त्याची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. शांगो आणि त्याचा भाऊ बर्नी या दोघांना 2017 मध्ये या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले आहे. त्यांचा जन्म सॅन फ्रान्सिस्कोच्या प्राणीसंग्रहालयात झाला व तेथूनच त्यांना मियामीत आणण्यात आले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post