प्योंगयांग - कोरोना संसर्गापासून उत्तर कोरीयात काय परिस्थिती आहे याबाबत अद्याप काहीच समजू शकले नव्हते. मात्र आज (दि. २६) एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उत्तर कोरियामध्ये कोरोना महामारीच्या तब्बल सात महिन्यांनंतर पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर हुकूमशहा किम जोंग उन चांगलेच भडकल्याचे चित्र आहे. त्यांनी देशातील आरोग्य यंत्रणेला धारेवर धरत कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर रोखण्याचा सज्जड आदेशच दिला आहे.
उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ कडक पावले उचलण्यात आली आहेत. हुकूमशहा किम जोंग उन यांनी दक्षीण कोरियाच्या जवळ असलेल्या कीसॉन्ग शहरात लॉकडाऊनचा आदेश दिला आहे. सरकारी मीडियाच्या माहितीनुसार, संदिग्ध कोरोनाग्रस्त हा एक फरारी आहे. ही व्यक्ती तीन वर्षांपूर्वी उत्तर कोरिया सोडून पळून गेली होती. मात्र, १९ जुलै रोजी या फरार असणा-या व्यक्तीने बेकायदेशीर रित्या सीमा पार करून पुन्हा उत्तर कोरियात प्रवेश केला होता.
या प्रकरणाचे माहिती मिळताच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी शनिवारी पॉलिट ब्यूरोची आपत्कालीन बैठक बोलावली. यात कीसॉन्ग शहरात लॉकडाऊनसह टॉप क्लास अलर्ट जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अशा लोकांची ओळख पटवली जात आहे जे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आले होते. संपर्कातील सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
या प्रकरणाची पुष्टी झाल्यास उत्तर कोरियातील हा पहिलाच कोरोनाग्रस्त असेल. शेजारच्या चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यावर यावर्षी जानेवारीत उत्तर कोरियाने सावधानतेचा पवित्रा घेत देशाच्या सर्व सीमा सील केल्या. हजारो लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. राजधानी प्योंगयांगमध्ये काम करणा-या सर्व अधिका-यांसाठी एक महिन्यासाठी अलगीकरणात राहणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. तथापि,
कोरोनाचा देशावर परिणाम होऊ शकतो...
उत्तर कोरिया जगातील अशा काही देशांपैकी एक आहे ज्यांनी कोरोना महामारी टाळण्यासाठी प्रथम पावले उचलली. देशातील अर्थव्यवस्था चीनमधील व्यवसायावर चालते. असे असूनही, कोरोनाच्या धोक्यामुळे उत्तर कोरियाने चीन सोबतचा व्यापार पूर्णपणे थांबविला आहे. तर दुस-या बाजूला उत्तर कोरियातील आरोग्य सुविधा इतर देशांपेक्षा चांगल्या नाहीत. आता जर कोरोनाने उत्तर कोरियावर पाय पसरले तर तेथे मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असे तज्ञांनी मत स्पष्ट केले आहे.
Post a Comment