पुण्यात समूह संसर्ग समजूनच तयारी



माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा समूह संसर्ग असल्याची चर्चा होत आहे. हा समूह संसर्ग आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. परंतु, प्रशासनाने आजपर्यंत जी तयारी केली आहे, ती समूह संसर्ग समजूनच केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गासंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेश, पुणे पालिका अतिरिक्‍त आयुक्‍त शांतून गोयल सहभागी झाले होते.

रुग्ण वाढले; पण मृत्यू दर स्थिर

राम म्हणाले की, पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये सरासरी दररोज दहा हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या काळात रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु, दुसरीकडे मृत्यूचा दर स्थिर आहे. रविवारी सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. मात्र, त्यातील अनेक मृत्यू हे दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post