सारोळा कासार ग्रामपंचायतच्या सरपंच पदी जयप्रकाश पाटील


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायतच्या सरपंच पदी जयप्रकाश पाटील यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे.

या पूर्वीच्या सरपंच सौ.आरती कडूस यांचे पद सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्या मुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ३ जुलै रोजी रद्द केले होते. त्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. शासन नियमातील तरतुदीनुसार उपसरपंच असलेले जयप्रकाश पाटील यांना त्यामुळे सरपंच पदाचा पदभार देण्यात आला आहे. तसेच याबाबतचा ठरावही शुक्रवारी (दि.२४) झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत बहुमताने करण्यात आला आहे. जयप्रकाश पाटील हे गेल्या ८ वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य तर २ वर्षांपासून उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक असलेल्या पाटील यांनी या कालावधीत हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांच्या पासून प्रेरणा घेत गावात सहकाऱ्यांच्या साथीने जलयुक्त शिवार योजना व पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाचे मोठे काम उभारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी पानी फाउंडेशनचे ४ लाख रुपयांचे बक्षीसही गावाला मिळालेले आहे.

सरपंच पदाचा पदभार घेतल्यानंतर पाटील यांचा ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे, गजानन पुंड,स्वाती धामणे,शीलाताई कडूस,आयेशा शेख,शिक्षकनेते संजय धामणे, संजय काळे,तालुका दुध संघाचे संचालक राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, बापूराव धामणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post