सात लाख विद्यार्थी वेटिंगवर!



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 13 सीईटींना राज्यभरातून तब्बल सात लाख विद्यार्थी बसणार आहेत. कोरोनाचे संकट तीव्र होत असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या परीक्षा दोनवेळा पुढे ढकलल्या आहेत. यानंतर या मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभाग पदवी परीक्षांच्या मागे राहिले. मात्र, या विद्यार्थ्यांची सीईटी होणार की नाही, याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. तब्बल सात लाख विद्यार्थी अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. मात्र, यंदा या परीक्षा कोरोनाचे वाढते संकट तीव्र झाल्याने पुढे ढकलल्या आहेत. 13 विविध सीईटींसाठी तब्बल 6 लाख 92 हजार राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याची फी भरली आहे. बारावीचा निकालही जाहीर झालेला आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे करिअर आता सुरू होणार आहे अशा बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालक संभ्रमात आहेत. या विद्यार्थ्यांच्या सीईटी वेळेत नाही झाल्या तर राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि डीएड, बीएड आदी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्रच कोलमडण्याची भिती आहे. या परीक्षानंतर निकाल जाहीर होण्यासाठी महिनाभराचा अवधी जातो. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा भरणे मुश्किल होणार आहे. संस्थाचालक आता आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post