मुंबई - राज्यातील कोराना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे तीन ऑगस्टपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आले आहे. ते आता सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्ये संपल्यानंतर पावसाळी अधिवेशन जूनमध्ये होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु, जूनमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने हे अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, कोरोना आटोक्यात येत नसल्यामुळे ही तारीखसुद्धा आता पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते दोन ते तीन दिवसांचे असेल. तसेच सोशल डिस्टन्सच्या पार्श्वभूमीवर गणपूर्तीची अट शिथिल करण्यात येणार आहे.
Post a Comment