शहरातील भराडगल्ली परिसरात नव्याने कंटेन्मेंट झोन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील भराडगल्ली परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरात 28 जुलैपर्यंत कंटेन्मेंट झोन महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घोषित केला आहे. तोफखाना परिसरातील भराडगल्ली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
या परिसरातून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या भागातील गर्दी टाळण्यासाठी चितळे रस्त्यावरील भाजी मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कन्टेन्मेंट झोन – भराडगल्ली, आर्यकुमार व्यायामशाळा, बेंद्रे ज्वेलर्स कोपरा, बिटला घर, हर्षल शेकटकर घर, भय्या परदेशी घर, सुजित हराळे घर, शिवरात्री दुकान हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. बफर झोन – तोफखाना परिसर, गंगा अपार्टमेंट, मेहसुनी टेलर परिसर, भैरवनाथ मंदिर परिसर, छाया टॉकीज, नेहरू मार्केट, चितळेरोड परिसर बफर झोनमध्ये आहे.
शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगरचा परिसर खुला
शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर परिसरातील कन्टेन्मेंट झोनची मुदत संपुष्टात आल्याने हा परिसर तब्बल 21 दिवसानंतर खुला झाला आहे. महापालिकेने या परिसरातील अंतर्गत रस्त्यावर लावलेले पत्रे काढून घेतले असल्याने वाहतूकीसाठी रस्ते खुले झाले आहेत. तोफखाना व सिद्धार्थनगर भागात साठ ते सत्तर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या दोन्ही परिसरातील कंन्टेन्मेंट झोनची मुदत 14 दिवसानंतर पुन्हा 7 दिवस वाढविण्यात आली होती. आता तो कालावधी संपुष्टात आला आहे. भराडगल्ली परिसर तोफखान्यालगतच असला तरी संपुर्ण तोफखान्याला कन्टेन्मेंट न करता भराडगल्ली परिसर हा मायक्रो कन्टेन्मेंट झोन करण्यात आला आहे.
Post a Comment