सोशल डिस्टन्सिंगची आठवण देणारे रिस्टबँड!



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - आरोग्याची काळजी घेणारे, हृदयाचे ठोके वगैरे मोजणारे रिस्टबँड असतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र सध्याच्या कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगची आठवण करून देणारेही रिस्टबँड तयार करण्यात आले आहेत. कॅनडात अशा रिस्टबँडची निर्मित करण्यात आली आहे.

कोरोनावर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हाच सध्या तरी उत्तम उपचार ठरलेला आहे. त्यासाठीच वारंवार हात धुणे, तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे आहे. अनेकांना एकमेकांपासून योग्य अंतर ठेवण्याचे भान राहत नाही. अशावेळी हे रिस्टबँड तशी आठवण करून देते.

कॅनडाच्या एका कंपनीनने बनवलेले हे रिस्टबँड दोन व्यक्ती एकमेकांपासून सहा फुटांपेक्षा कमी अंतरावर आल्यावर त्यांना सावध करते. त्यावेळी त्याचा अलार्म वाजतो किंवा तो फ्लॅश देतो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल मॅकडोनाल्ड यांनी सांगितले, की सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी लोकांना एक प्रकारचे ‘रिमाईंडर’ हवे असते आणि हेच लक्षात घेऊन असे रिस्टबँड विकसित करण्यात आले आहेत. कंपनीने आतापर्यंत असे दहा हजार रिस्टबँड विकले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post