‘ध्रुवास्त्र’ची यशस्वी चाचणी
माय अहमदनगर वेब टीम
बालासोर - ओडिसाच्या बालासोर येथे ‘ध्रुवास्त्र’ या क्षेपणास्त्राची Dhruvastra missile यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 4 किलोमीटर ते 7 किलोमीटरपर्यंत आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी सध्या हेलिकॉप्टरविना करण्यात आली.
ध्रुवास्त्रचा वापर भारतीय लष्कराकडील Indian Army ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे. या क्षेपणास्रात शत्रूच्या रणगाड्यांची क्षणार्धात राखरांगोळी करण्याची क्षमता आहे.
ध्रुवास्त्र पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. भारताच्या डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनने (डीआरडीओ) Defence Research and Development Organisation (DRDO) बनवलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव नाग असे होते, ते नंतर बदलून ध्रुवास्त्र केले गेले. आता हे क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
Post a Comment