उद्या बारावीचा ऑनलाइन निकाल
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै 2020 रोजी संकेतस्थळावरती ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
दरवर्षी मे महिन्या अखेर जाहीर होणारा निकाल यावर्षी कोरोना विषाणूचा संकटामुळे लांबला होता. गेल्या काही दिवसापासून जुलैच्या मध्यावर्ती निकाल लागणार असल्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा सुरू होत्या दरम्यान आज सायंकाळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेले काही महिन्यापासून असलेली प्रतीक्षा आता थांबली आहे.
आता दहावीच्या निकालाची प्रतिक्षा असली तरी येत्या आठवड्याभरात त्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै महिना अखेर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
Post a Comment