'मुख्यमंत्र्यांची बाग बहुमत सिद्ध करण्याची जागा नव्हे
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राजस्थानातील काँग्रेस सरकारवरचे अस्थिरतेचे ढग काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपले बंडाचे निशाण खाली ठेवल्याच्या, गेहलोत यांच्याकडे बहुतम असल्याच्या बातम्या येत आहेत, पण त्यांच्या एका खंद्या समर्थकाने हा दावा खोडून काढला. याचबरोबर या समर्थकाने सचिन पायलट भाजपवासी झालेले नाहीत असेही स्पष्ट केले.
या पायलट समर्थकाने दावा केला आहे की गेहलोत जो बहुमताच्या आकड्याचा दावा करत आहेत तो आकडा त्यांच्याकडे नाही. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामधील गार्डन हे बहुमत सिद्ध करण्याची जागा नाही. ते सभागृहात सिद्ध होते. जर गेहलोत त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे असा दावा करत आहेत तर मग त्यांनी सर्व आमदरांना राज्यपालांकडे का नेले नाही. त्यांना हॉटेलवर का पाठवले. असे म्हणत राजस्थानातील राजकीय अस्थिरतेचे ढग अजून हटलेले नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
दरम्यान, राजस्थान काँग्रेसचे प्रमुख असलेले सचिन पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवसास्थानावर आयोजित केलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीनंतर गेहलोत आणि उपस्थित आमदारांनी व्हिक्टरी साईन करत सरकार स्थिर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकील 90 आमदारच हजर होते. त्यानंतर सर्व आमदारांना बसमधून अज्ञातस्थळी हलवण्यात आले.
आज सकाळी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी जर पक्षात कोणा नाराज असेल तर त्यांनी आपली नाराजी पक्षाशी बोलून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यांनी 'मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या वतीने कळवू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे दरवाजे सचिनजी आणि इतर सदस्यांसाठी कायम उघडे आहेत.' असे म्हणत वरिष्ठांशी चर्चा करा असा संदेश नाराज गटाला दिला.
Post a Comment