मालिका विजयासाठी विंडीज सज्ज
माय अहमदनगर वेब टीम
मँचेस्टर - इंग्लंड आणि विंडीज या दोन संघांमध्ये सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत विंडीज संघाने १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टर या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना १६-२० जुलै दरम्यान होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर पडलेला इंग्लंड संघ मालिकेत दणक्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
इंग्लंड संघासाठी महत्वाची बाब म्हणजे नियमित कर्णधार ज्यो रूट या सामन्यातून पुनरागमन करणार आहे. नवख्या इंग्लंडला फलंदाजीतील आपली कामगिरी सुधारण्याची चांगली संधी असून, मागील सामन्यातील आपल्या चुका सुधारून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी इंग्लंड उत्सुक आहे. तर दुसरीकडे मालिका विजयासाठी विंडीज संघ सज्ज आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.
विंडीज संघाच्या फलंदाजीची मदार क्रेग ब्रेथवेट , जॉन कँबेल , शाई होप , ब्रूक्स , ब्लॅकवूड , रोस्टन चेस डॉवरीच यांच्यावर आहे. तर अष्टपैलूंमध्ये रोस्टन चेस , जेसन होल्डर राहकिम कोनवाल , रेमन रिफर आहेत. गोलंदाजीत केमार होल्डर , जेसन होल्डर , शेनन गॅब्रील , अलझारी जोसेफ आहेत.
इंग्लंड संघाच्या फलंदाजीची मदार रोरी बर्न्स , डोमिनिक सिबली, जो रूट ,झॅक क्रावली, जोस बटलर , ओली पोप यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये बेन स्ट्रोक्स , ज्यो देनली , जाफ्रा आर्चर आहेत. गोलंदाजीत जेम्स अँडरसन , स्टुअर्ट ब्रॉड , डोमिनिक बीस , मार्क वूड , जाफ्रा आर्चर हे पर्याय आहेत.
या मैदानाचे नाव 'एमिरेट्स ऑल ट्रॅफर्ड' असे आहे. येथे एकूण १९ हजार प्रेक्षक बसू शकतात. स्ट्रीटफर्ड एन्ड आणि ब्रायन स्टेतथं एन्ड असे दोन एंड्स आहेत. हे मैदान लँकेशार संघाचे घरचे मैदान आहे. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ऑस्ट्रेलिया ६५६-८ विरुद्ध इंग्लंड २३ जुलै १९६४, सर्वाधिक स्कोर ज्यो रूट २५४ विरुद्ध पाकिस्तान २२ जुलै २०१६, सर्वाधिक धावा माईक अथारतन १० सामने १८ डाव ७२९ धावा, सर्वाधिक स्कोर १३१ २ शतके ३ अर्धशतके , बेस्ट बॉलिंग एमडी मार्शल १५.४ षटके ५ निर्धाव २२ धावा ७ बळी.
इंग्लंड : रोरी बर्न्स, जो रूट, डोमिनिक सिबली, ज्यो देनली, झॅक क्रावली, जोस बटलर, ओली पोप, बेन स्ट्रोक्स, जाफ्रा आर्चर, क्रिस वोक्स, मार्क वूड, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, डोमिनिक बीस.
विंडीज : जॉन कँबेल, क्रेग ब्रेथवेट, ब्रूक्स, शाई होप, रोस्टन चेस, ब्लॅकवूड, शेन डॉवरीच, रहकीम कोनवाल, निकूम बोनर, रेमन रिफर, अलझारी जोसेफ, केमार होल्डर, केमार रोच आणि शेनन गॅब्रील
Post a Comment