का गाठला सोन्याने उच्चांक ?
माय अहमदनगर वेब टीम
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीने आठ वर्षांच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे या पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या ग्नसराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
राज्याची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50,282 रुपये आणि त्यावर जीएसटी जवळपास 1500 रुपये असे सुमारे 51,782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसर्यापर्यंत 55 ते 56 हजारांच्या आसपास जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असुरक्षित वातावरणात ही सुरक्षित गुंतवणूक असल्याने लोकांचा सोन्याकडे कल दिसत आहे.
सध्या सोन्याचा अंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता सोनं 1700 ते 1800 डॉलरला पार करून पूढे गेले आहे. लॉकडाऊनच्या आधी सोनं 1250 च्या आसपास होतं. परंतू आता लॉकडाऊनचा परिणाम सोन्यावर जाणवू लागला आहे. भारतीय बाजाराचा विचार करता सोनं 38 हजार ते 40 हजाराच्या आसपास होते. परंतु आजअखेर त्यात 10 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ होण्यामागे कोरोना महामारी प्रमुख कारण आहे. यामध्ये अनेकांचा लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूसंसर्गाचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या देशात सोन्याची आयात कमी प्रमाणात झाली आहे. यासोबतच ज़गभरात सोन्याच्या ज्या खाणी आहेत तिथं कोरोना व्हायरसचा फटका बसल्यामुळे कामगार कमी आहे. या सर्व बाबींचा परिणाम सोन्याचे दर वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत.
Post a Comment