सीबीएसईमध्ये विद्यार्थीनींची बाजी; गतवर्षीच्या तुलनेत निकाल ५ टक्क्यांनी अधिक



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक​ शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवार दुपारी कुठलीही पूर्वसूचना न देता इयत्ता १२ वी चा निकाल घोषित केला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना महारोगराईच्या संकट काळात सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली.  मंडळाचा निकाल यंदा ८८.७८ %  लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकाल बराच समाधानकारक आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यंदा १० लाख ५९ हजार विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनाच्या संकट काळात परीक्षा रद्द करून सीबीएसई तर्फे सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुण पद्धतीच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, हे विशेष.

२०१९ च्या तुलनेत निकाल यंदा ५ टक्क्यांनी जास्त

२०१९ मध्ये सीबीएसईच्या इयत्ता बारावीचा निकाल ८३.४० टक्के लागला होता. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ५.३८ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. बंगळुरु विभागाचा निकाला सर्वाधिक ९७.०५ टक्के लागला. यंदा सीबीएसई कडून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. बंगळुरु सह पश्चिम दिल्लीचा ९४.६ टक्के निकाल लागला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सरासरी निकाल ९४.३९ टक्के लागला आहे. इयत्ता बारावीत यंदा १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी  यंदा बाजी मारली आहे. विद्यार्थींनींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.१५ टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८६.१९ टक्के नोंदवण्यात आले.

कुठल्या राज्यात किती टक्के निकाल?

देशात यंदा सीबीएसईच्या तिरुअनंतपूरम विभागाचा निकाल चांगला राहीला. विभागातील ९७.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तिरुअनंतपूरम पाठोपाठे बंगळुरुचा निकाल ९७.६७ टक्के, चेन्नई ९६.१७ टक्के पश्चिम दिल्ली ९४.६१ टक्के तसेच पूर्व दिल्लीचा निकाल ९४.२४ टक्के लागला. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडाचा निकाल ८४.८७ टक्के, तर प्रयागराज चा निकाल ८२.४९ टक्के, अजमेरचा निकाल ८७.६० टक्के राहीला.

संकेतस्थळ क्रॅश

सोमवारी दुपारनंतर निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याने सीबीएसईचे संकेतस्थळ क्रॅश झाले होते. विद्यार्थ्यांना त्यामुळे  त्यामुळे बरीच प्रतिक्षा करावी लागली.  सीबीएसईकडून त्यामुळे लॅन्डलाईन क्रमांक घोषित केला. एनआयसी च्या ०११-२४३००६९९ क्रमांकावर तसेच एमटीएनएल च्या ०११-२८१२७०३० या क्रमांकावर फोन करून आसन क्रमांक तसेच जन्मतारीख सांगून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येवू शकतो. या सेवेसाठी विद्यार्थ्यांकडून मिनिटांसाठी  ३० पैसे आकारण्यात  आले.

कुठलीही पूर्वसूचना न देता निकाल घोषित

निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाने कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. गतवर्षी निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाउनमुळे निकाल जाहीर होण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सुप्रीम कोर्टाने निर्णयानंतर सीबीएसईने १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या  १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसेच असेसमेंट स्कीम अंतर्गत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. बोर्डाच्या परीक्षांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की १० वी आणि १२ वीचे निकाल १५ जुलै रो

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post