वॉशिंग्टन - मास्क वापरलेच पाहिजे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी गेल्या 4 महिन्यांपासून सुरु असलेल्या करोनाच्या संकटात मास्क घालण्यास नकार दिला होता. मात्र, शनिवारी (11 जुलै) पहिल्यांदाच ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून दिसले आहेत.
जगभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत आहेत. करोना विषाणूचा कहर जगभरात दिसत असताना ट्रम्प यांनी कधीच मास्कचा वापर केला नाही.
ट्रम्प यांनी शनिवारी वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी जवानांची व आरोग्य कर्मचार्यांची भेट घेतली. या भेटीवेळी ट्रम्प यांनी तोंडावर मास्क लावलेला होता. 4 महिन्यात प्रथमच आरोग्य अधिकार्यांच्या सूचना ट्रम्प यांनी मान्य केल्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला.
वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्र वॉशिंग्टनमध्ये आहे. ट्रम्प विमानाने तेथे गेले. जेव्हा ट्रम्प व्हाइट हाऊसच्या बाहेर आले, तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितले, जेव्हा तुम्ही खास करून रुग्णालयात असता तेव्हा मास्क वापरलाच पाहिजे. वॉल्टर रीड हॉलवेमध्ये आल्यानंतर ट्रम्प यांनी दौरा सुरू होताच मास्क घातला. हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना त्यांनी मास्क घातला नव्हता. ट्रम्प हे कोरोनाचा प्रसार झाल्यापासून सगळ्यात उशिरा मास्कचा वापर करणार्यांपैकी एक आहेत.
Post a Comment