जागतिक आरोग्य संघटना चीनमध्ये



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चीनच्या वूहान शहारतून पसरलेल्या करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. मात्र, हा विषाणू कसा आला? कुठून आला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन तज्ञ चीनमध्ये जाणार आहेत. हे तज्ञ पुढील दोन दिवस चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहणार आहेत. तिथून ते याचा तपास सुरु करणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दोन तज्ज्ञांपैकी एक प्राणी तज्ञ आहे, तर दुसरे महामारी रोग तज्ञ आहेत. या तपासणी दरम्यान, हा विषाणू प्राण्यांमधून मानवांपर्यंत कसा आला याचा तपास केला जाणार आहे. हा विषाणू सुरुवातीला वटवाघळांमधून इतर प्राण्यांमध्ये गेला, त्यानंतर हा विषाणू मानवांपर्यंत पोहोचला, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

यानंतर चीनने प्राण्यांच्या बाजारपेठेत आणि त्यांच्या विक्रीवर काही बदल केले आहेत. परंतु चीनच्या या बाजारपेठांवर जगभरातून टीका होत आहे. या दबावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूचे मूळ जाणून घेण्यासाठी चीनला एक टीम पाठवण्याची घोषणा केली ज्यावर चीनने सहमती दर्शवली. मात्र, जगातील प्रत्येक देशात याची चौकशी व्हायला हवी असं चीनने म्हटलं. विशेष म्हणजे, करोना विषाणू प्रकरणावर जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे.

यामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचमधून बाहेर पडली आहे.चीनच्या वूहान शहारतून पसरलेल्या करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. मात्र, हा विषाणू कसा आला? कुठून आला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन तज्ञ चीनमध्ये जाणार आहेत. हे तज्ञ पुढील दोन दिवस चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहणार आहेत. तिथून ते याचा तपास सुरु करणार आहेत.

थकज च्या दोन तज्ज्ञांपैकी एक प्राणी तज्ञ आहे, तर दुसरे महामारी रोग तज्ञ आहेत. या तपासणी दरम्यान, हा विषाणू प्राण्यांमधून मानवांपर्यंत कसा आला याचा तपास केला जाणार आहे. हा विषाणू सुरुवातीला वटवाघळांमधून इतर प्राण्यांमध्ये गेला, त्यानंतर हा विषाणू मानवांपर्यंत पोहोचला, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

यानंतर चीनने प्राण्यांच्या बाजारपेठेत आणि त्यांच्या विक्रीवर काही बदल केले आहेत. परंतु चीनच्या या बाजारपेठांवर जगभरातून टीका होत आहे. या दबावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूचे मूळ जाणून घेण्यासाठी चीनला एक टीम पाठवण्याची घोषणा केली ज्यावर चीनने सहमती दर्शवली. मात्र, जगातील प्रत्येक देशात याची चौकशी व्हायला हवी असं चीनने म्हटलं. विशेष म्हणजे, करोना विषाणू प्रकरणावर जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. यामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचमधून बाहेर पडली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post