हँड सॅनिटायझर खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - करोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना तसंच आरोग्य संस्थांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी करण्यात येतात. या सूचनांनुसार मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, हँड सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणे इत्यादी गोष्टींचाही समावेश आहे. या सर्व सूचनांचं तुम्ही योग्य पद्धतीनं पालन करत असाल.
पण हँड सॅनिटायझर निवडताना कोणताही निष्काळजीपणा करत नाहीय ना? सॅनिटायझर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेणे करून करोना विषाणूपासून बचावही होईल आणि त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवणार नाहीत. कारण हँड सॅनिटायझरमधील घटकांमुळे त्वचा आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
हँड सॅनिटायझरची निवड कशी करावी?
करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हँड सॅनिटायझरमध्ये ७० ते ८० टक्के अॅल्कोहोल असणं गरजेचं आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये केमिकल नसावे. केमिकलयुक्त हँड सॅनिटायझर वापरल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकते. व्हायरसच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासह आपले हात मऊ आणि निरोगी राहतील, अशा हँड सॅनिटायझरची निवड करावी. काही सॅनिटायझरच्या वापरामुळे त्वचा कोरडी होते. यामुळे हात आणि नखांच्या क्युटिकल्सचे नुकसान होतं.
एफडीएच्या सूचना
फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन नुसार कोणत्या प्रकारचे हँड सॅनिटायझर वापरणे फायदेशीर ठरेल तसंच कोणते सॅनिटायझर अजिबात खरेदी करू नये याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
असे सॅनिटायझर खरेदी करू नका
एफडीएनुसार मिथेनॉल असणारं सॅनिटायझर खरेदी करणं टाळावं. मिथेनॉल रसायन आपल्या आरोग्यासाठी घातक असते. म्हणजे यामध्ये विषारीयुक्त घटकांचा समावेश असतो.
आरोग्याच्या समस्या
एफडीएच्या माहितीनुसार मिथेनॉल असणारं हँड सॅनिटायझर वापरल्यानंतर आजारी पडलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. त्वचेनं मिथेनॉल शोषून घेतल्यानं काही जणांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला होता.
मिथेनॉल सॅनिटायझरमुळे होणाऱ्या समस्या
मिथेनॉलयुक्त सॅनिटायझरचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये मळमळ होणे, डोकेदुखी, डोळ्यांना अंधुक दिसणे, वारंवार शिंका येण्याचा त्रास आढळून आला.
थकवा येणे
याव्यतिरिक्त काही जणांमध्ये थकवा येणे आणि भूक न लागणे किंवा कमी प्रमाणात जेवणे अशा समस्याही दिसून आल्या. तुम्ही देखील या समस्यांचा सामना करत आहात तर आपल्या सॅनिटायझरच्या बॉटलवर दिलेली इंग्रीडिऐंट्सची माहिती एकदा तपासून पाहा. मिथेनॉल असणारं हँड सॅनिटायझर वापरणे टाळा.
घरगुती हँड सॅनिटायझर
तुम्ही घरामध्येही हँड सॅनिटायझर तयार करू शकता. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरची मागणी वाढत आहे. काही कंपन्यांनी प्रोडक्टच्या किमती वाढवल्या आहेत तर काही प्रोडक्टची गुणवत्ता अतिशय वाईट आहे. यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या समस्या टाळण्यासाठी होममेड सॅनिटायझर वापरणे फायदेशीर ठरेल. बाजारातील सॅनिटायझरमुळे हात रुक्ष होणे, हातांना सूज येणे, लालसरपणा आणि त्वचेशी संबंधित अन्य समस्या देखील उद्भवतात.
हात मऊ राहण्यासाठी उपाय
कसे तयार करायचे सॅनिटायझर?
क्लिनिकल स्पीरिट तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरित्या मिळेल. आता १०० मिली स्पीरिट बाटलीमध्ये भरून घ्या. यानंतर गुलाब पाणी आणि शेवटी दोन चमचे ग्लिसरीन मिक्स करा. ग्लिसरीनमुळे हात मऊ राहतील. सर्व सामग्री योग्य पद्धतीनं मिक्स करून घ्या. घरगुती हँड सॅनिटायझरमुळे आरोग्यास अपाय होणार नाही.
Post a Comment