पावसाळ्यात खा 'हे' फूड्स; त्यामुळे आजार राहतात दूर
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पावसाळ्यामध्ये अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने पोटाच्या समस्यांचा समावेश होत असतो. अशातच पावसाळ्यात हेल्दी आणि आयुर्वेदिक डाएट फॉलो करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. जर व्यक्ती आयुर्वेदिक डाएट फॉलो करत असेल तर इम्युनिटी बूस्ट करण्यासोबतच स्वतःला फिट अन् हेल्दी ठेवण्यासाठी मदत होते.
हिरव्या पालेभाज्या
पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला अनेकजण देत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं शक्य असेल तेवढं टाळावं. पावसाळ्यांमध्ये अनेक किटकांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या पालेभाज्यांवर किडे असण्याची शक्यता आणखी वाढते. त्यामुळे पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या न खाणं फायदेशीर ठरतं.
तूप
पावसाळ्यामध्ये पचनक्रियेवरही परिणाम होतो. त्यामुळे अनेक लोकांना पचनाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. जेवणामध्ये तूपाचा समावेश करणं यावर उत्तम उपाय ठरतो. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच पोटाच्या सर्व समस्या दूर होऊन पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठीही मदत होते.
डायजेशन बूस्ट करण्यासाठी
डायजेशन बूस्ट करण्यासाठी जेवणामध्ये आल्याचा छोटा तुकडा आणि थोडं काळ मीठ वापरणं फायदेशीर ठरतं. तसेच पावसाळ्यात दही खाणं शक्यतो टाळा. त्यापेक्षा तुम्ही ताकाचा आहारात समावेश करू शकता.
तुळस
चहा किंवा जेवणासोबतच तुळशीचा काढा किंवा तुळशीची पानं खा. पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो. त्यामुळे अनेक बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. तुलशीमधील ्नेक गुणधर्म या घातक बॅक्टेरियांपासून आरोग्याचं रक्षण करण्यासाठी बचाव करतात.
मध
आपल्या डाएटमध्ये मधाचा समावेश करा. मध शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. यामुळे शरीराला आजारांसोबतच अॅलर्जीशी दोन हात करण्यासाठी मदत मिळते.
कच्चे अन्नपदार्थ खाणं टाळा
पावसाळ्यात कच्चे अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळा. यामध्ये किडे आणि बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते. पण हेच पदार्थ शिजवल्यानंतर त्यांच्यातील घातक बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे पावसाळ्यात कच्च्या पदार्थांऐवजी शिजवलेले पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
Post a Comment