या यादीत ते आशियातील एकमेव अब्जाधीश
माय अहमदनगर वेब टीम
जिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रांती घडवणारे भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनी आता अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे.
यावर्षी अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्ससाठी अनेक मोठ्या गुंतवणुका मिळवल्या. ते आता ६८३० कोटी डॉलर (सुमारे ५.१४ लाख कोटी रु.) नेटवर्थसह बफे यांच्या पुढे निघून गेले. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार बफे यांची नेटवर्थ ६७९० डॉलर (५.१० लाख कोटी रुपये) इतकी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स यंदा मार्चच्या किमान स्तरावर आतापर्यंत दुपटीहून अधिक वधारले आहेत. तेव्हापासून कंपनीला १५०० कोटी डॉलर सुमारे १.१२ लाख कोटी रु. इतकी गुंतवणूक मिळाली. गंुतवणूकदार प्रमुख कंपन्यांत फेसबुक व सिल्व्हर लेक यांचाही समावेश आहे. या आठवड्यात बीपीनेही रिलायन्सच्या फ्यूएल रिटेल बिझनेसमध्ये भागीदारी मिळवण्यासाठी १०० कोटी डॉलर्स (सुमारे ७.५ हजार कोटी रु.) गुंतवणूक केली.
टॉप-१० मध्ये एकमेव आशियाई मुकेश अंबानी : संपत्तीत वाढ झाल्याने ६३ वर्षीय मुकेश अंबानी यांचा जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत ते आशियातील एकमेव अब्जाधीश आहेत. यादीत त्यांना ८ वे स्थान आहे. बफे यांनी २९० कोटी दान केल्याने त्यांच्या संपत्तीत सध्या घट झालेली आहे.
Post a Comment