सौरभ गांगुली होम क्वारंटाईन; मोठ्या भावाला कोरोनाची लागण!


माय अहमदनगर वेब टीम
कोलकाता - कोरोनाने क्रिकेट क्षेत्रातही शिरकाव केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांचे मोठे भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव स्नेहाशीष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सौरव गांगुली यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे.
स्नेहाशीष गांगुली हे पश्चिम बंगालमधील प्रथम श्रेणीचे माजी खेळाडू आहेत. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बेले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्नेहाशीष गांगुली यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हेल्थ प्रोटोकॉलनुसार सौरभ गांगुली यांनी काही काळांसाठी होम क्वारंटाईन व्हावे लागेल, असे गांगुली यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले आहे.

स्नेहाशीष गांगुली यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर ते सौरभ गांगुली रहात असलेल्या बेहला येथील वडिलोपार्जित घरात राहण्यास आले होते. आता त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने सौरभ यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post