भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत नगर जिल्ह्यातील यांना संधी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – महाराष्ट्र भाजपची राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.३) दुपारी जाहीर केली आहे. यामध्ये ५ सरचिटणीस व १२ प्रदेश उपाध्यक्षांचा समावेश असून अहमदनगर जिल्ह्यातील माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे व कोपरगावच्या माजी आ.स्नेहलता कोल्हेंना यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपची कार्यकारिणी

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय,

संघटन महामंत्री – विजय पुराणिक

उपाध्यक्ष – माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

सेक्रेटरी – माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर

कोषाध्यक्ष – मिहीर कोटेजा

विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ

पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान नाही

राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. “पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी, पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असं नाही, असंही स्पष्टीकरण दादांनी दिलं.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोना संकटामुळे भाजपची कार्यकारणी घोषित करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे थोडा वेळ लागला. या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत”.
कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post