जाँटी, आॅस्ट्रेलियन खेळाडंूसाठीच्या सहभागासाठी लँगरचे साकडे



माय अहमदनगर वेब टीम
आयपीएल हा वार्षिक कॅलेंडरचा महत्त्वाचा भाग मानला जाताेे. यात खेळण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक असतात अशी प्रतिक्रिया आफ्रिकन क्रिकेटपटू जाँटी राेऱ्हड्सने दिली. दुसरीकडे क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे लँगर यांनीही लीग आयाेजनाबाबतचे मत मांडले आहे. मात्र, काेराेनाचे महासंकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे क्रीडा विश्वामधील अडचणीही तशाच आहेत. यातूनच माेठ्या स्पर्धांच्या आयाेजनावर अद्याप टांगती तलवार आहे. यामध्ये जगाच्या कानाकाेपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) समावेश आहे. या लीगच्या आयाेजनाबाबत जगातील काेट्यवधी चाहत्यांसह सहभागी हाेणाऱ्या संघातील खेळाडूही उत्सुक आहेत. आॅस्ट्रेलियन खेळाडू देशातील टी-२०वर्ल्डकप रद्द करावा, अशी मागणी करत लीगमध्ये खेळण्याच्या तयारीत आहेत.


आयपीएल पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहाेत

आयपीएलमुळे खेळाडूंना नवीन व्यासपीठ लाभत असते. त्यामुळे वर्षात एकदा तरी या लीगमध्ये सहभागी व्हावे, असे प्रत्येक खेळाडूला वाटते. त्या सर्व खेळाडूंचा यासाठी प्रयत्नच असताे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंच्या करिअरमध्ये या लीगला महत्त्वाचे स्थान आहे. याशिवाय क्रिकेटच्या वार्षिक कॅलेंडरमध्येही याला महत्त्वाचा भाग मानले जाते. त्यामुळे ही लीग यंदाच्या सत्रात काेराेनामुळे अडचणीत सापडली आहे. यातून खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशात सध्याची परिस्थिती देखील अधिकच गंभीर आहे. मात्र, यंदाची आयपीएल पाहण्यासाठी आम्ही सर्व जण अधिक उत्सुक आहाेत. ही लीग कधी एकदा सुरू हाेते, असेच आम्हाला वाटते, अशा शब्दात दक्षिण आफ्रिकन माजी क्रिकेटपटू आणि जगातील प्रसिद्ध क्षेत्ररक्षक जाँटी राेऱ्हड्सने आपली उत्सुकता कथन केली. ताे लीगमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षक काेच म्हणून कार्यरत आहे.


बीसीसीआय पडले ताेंडघशी; न्यूझीलंड मंडळाची स्पष्टाेक्ती

वेलिंग्टन | आयपीएल आयाेजनासाठी आम्ही काेणत्याही प्रकारचा प्रस्ताव पाठवला नाही, अशा शब्दात न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने स्पष्टाेक्ती करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ताेंडघशी पाडले. या लीगच्या यजमानपदासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळ उत्सुक असल्याची प्रतिक्रिया बीसीसीआयने दिली हाेती. मात्र, हे साफ चुकीचे असल्याचे न्यूझीलंड मंडळाने स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post