‘गवार’ खाल्याने हे होतात फायदे; मग हे वाचा


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - आपल्याला अनेक भाज्यांचे वावडे असते. पण त्यातीलच एक भाजी म्हणजे गवार घरात जर हि भाजी बनवली तर आपण ती खाणे टाळतो. पण प्रत्येकवेळा आहारात नाकारली जाणारी गवार आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण गवार ही अनेक आजारांवर उपयुक्त आहे. त्यामुळे आपण गवार या भाजीचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

या आजारांसाठी उपयुक्त आहे गवार

१) मधुमेह : गवारीमध्ये आढळून येणारे ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात. डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्लेली त्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते. गवारमध्ये कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम हाडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात. शारीरिक स्वरुपात कमजोर व्यक्तीने गवारीचे दररोज सेवन करावे.


२) हृदयरोग : गवारीची भाजी हृदय रोगासाठी उत्तम आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गवारीमध्ये आढळून येणाऱ्या फायबरला कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानले आहे.


३) दमा : गवारही दम्यासाठीही खूप फायदेशीर आहे. गवार पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो. दमा असणाऱ्या व्यक्तींनी गवारीच्या शेंगा कच्च्या खाल्या तर त्यांना फायदा होतो.


४) खाज आणि डाग : गवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या ३-४ कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल. कच्ची गवार बारीक करून यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबिर टाकून चटणी तयार करून घ्यावी. दररोज या चटणीचे सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post