भिंगार मधील हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – भिंगार शहरातील माळगल्ली, नेहरू चौक परिसरात तब्बल २५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी या परिसरात ३१ जुलैपर्यंत कंटेन्मेंट झोन केला आहे. तर सदर बाजार व उर्वरित भिंगार शहर बफर झोन असणार आहे.
भिंगार मधील माळगल्ली, नेहरू चौक परिसरात तब्बल कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातून इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
यामध्ये माळगल्ली, नेहरू चौक, घास गल्ली, शिवाजी चौक व गवळीवाडा हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. तसेच सदर बाजार व उर्वरित भिंगार शहर हे ३१ जुलै रोजी रात्री १२ वाजे पर्यंत बफर झोन असणार आहे. हा आदेश शनिवारी (दि.१८) दुपारपासून लागू करण्यात आला आहे.
घोषीत कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री सेवा इ. वर नमूद केलेल्या कालावधीत बंद राहतील.
तसेच बफर झोन मधील अत्यावश्यक सेवा (दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे, दवाखाना, राष्ट्रीयकृत बँका व तसेच नागरी तथा सहकारी बँका) वगळून इतर सर्व आस्थापना वर नमूद केलेल्या कालावधीत बंद ठेवण्याबाबत या आदेशाद्वारे आदेशीत करीत आहे. सदरच्या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच क्षेत्रातून (नगर-पाथर्डी महामार्ग वगळून) वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
तसेच भाजीपाला व फळ विक्री ही अधिकृत दुकाना व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी एका जागी बसून करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत आहे. भाजीपाला व फळ विक्रेते यांनी हातगाडी किंवा टॅम्पो रिक्षा द्वारे फिरून विक्री करावी. असे या आदेशात म्हंटले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई केली जाणार आहे.
Post a Comment