डिजिटल शिक्षणासंबंधी केंद्राची गाईडलाइन्स जारी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना महामारीच्या काळात पूर्वीसारखे शाळेत शिक्षण देणे जमणार नसल्याने सद्यःस्थितीत विद्यार्थ्यांना घरी राहूनच ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. पण असे करत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाइन्समध्ये डिजिटल शिक्षण देताना स्क्रीन टाईमबाबत मार्गदर्शन करताना प्राथमिक (प्री प्रायमरी) शिकण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्क्रीन टाईमची अट ३० मिनिटांपेक्षा जास्त असू नये, असे सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्स द्वारे पूर्व प्राथमिकसाठी स्क्रीन टाईमची अट ३० मिनिट आहे. इयत्ता पहिली ते आठवीसाठी ३० ते ४० मिनिटांचे दोन सेशनमध्ये क्लास घ्यावे. तर इयत्ता नववी ते बारावीसाठी हा वेळ ३० ते ४० मिनिटांचे चार सेशनमध्ये क्लास घेऊन शिक्षण देण्यात यावे, असे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्वीट करत शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांना डिजिटल शिक्षणसंबंधी मार्गदर्शन म्हणून या गाईडलाइन्स जाहीर केल्या. तसेच स्क्रीन टाईमसोबत डिजिटल शिक्षण घेत असताना मानसिक-शारीरिक स्ट्रेसला कसा दूर करता हेही सांगितले आहे. यावेळी 'प्रज्ञाता' गाईडलाईन्समध्ये प्रामुख्याने आठ मुख्य स्टेप्सनुसार ऑनलाईन शिक्षण शिकवतानाच्या सूचना केल्या आहेत.
यामध्ये प्लान (नियोजन), रिव्हीव्ह ( उजळणी करणे), अरेंज (योजना), गाईड (मार्गदर्शन करणे), बोलणे(talk), असाईन (अभ्यास करायला सांगणे), अभ्यासाच्या एका विशेष पद्धतीने अभ्यासक्रम पुढे घेऊन जाणे(track), दाद देणे (appreciate) या महत्वाच्या स्टेप्सवर विशेष सूचना केल्या असून त्या त्या कशा अमलात आणायच्या याबाबत सांगितले गेले आहे.
Post a Comment