सीएची परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार!



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चार्टर्ड अकौंटंट अर्थात सीएची २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून ही परीक्षा आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेत विलीन करण्यात आली आहे. याचा अर्थ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसोबत गत मे महिन्यात होऊ न शकलेली ही परीक्षा होणार आहे.
सीएच्या परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजे मे आणि नोव्हेंबर महिन्यात होतात. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत होईल, असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले होते. तथापि कोरोना संक्रमण मे महिन्याच्या तुलनेत कितीतरी जास्त वाढल्याने २९ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयसीएआयकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले.

मे महिन्यात होणारी परीक्षा आता थेट नोव्हेंबरमधील परिक्षेसोबत घेतली जाणार असल्याचेही आयसीएआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संक्रमणामुळे केवळ सीएचीच नव्हे तर इतर सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा बाधित झालेल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post